रत्नागिरी : जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक फोटोग्राफर अधिक प्रगत व प्रशिक्षित व्हावेत. छायाचित्र कले मधील नवनवीन टेक्निक्स त्यांना अद्यावत व्हावीत यासाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशन वतीने नेहमीच विविध कार्यशाळांचे मोफत आयोजन रत्नागिरी जिल्ह्यातील फोटोग्राफर बंधूंसाठी जिल्हा असोसिएशन वतीने केले जात असते त्याचाच एक भाग म्हणून रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन आणि कोवॅक सर्व्हीसेस पुरस्कृत प्री-वेडिंग फोटोग्राफी सिनेमेटोग्राफी वर्कशॉप चे आयोजन करण्यात येत आहे. या वर्कशॉप साठी प्रसिद्ध फोटोग्राफर मा. प्रमोद गायकवाड सर प्रशिक्षक म्हणून उपस्थित असणार आहेत.
रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन आणि दापोली तालुका फोटोग्राफर व्हिडिओ असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने हे वर्कशॉप दिनांक 9 नोव्हेंबर 2024 रोजी स्थळ: केशवराज दापोली, तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या ठिकाणी होत आहे.आणि रत्नागिरी तालुका फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक10 नोव्हेंबर रोजी स्थळ: भाटे बीच आणि नारळ संशोधन केंद्र सभागृह भाटे रत्नागिरी शहर येथे होणार आहे. तसेच कुडाळ तालुका ( सिंधुदुर्ग जिल्हा) फोटोग्राफर असो.यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक 11 नोव्हेंबर 2024 रोजी स्थळ कोकण हेरिटेज रिसॉर्ट कुडाळ येथे होणार आहे सर्व वर्कशॉप ची वेळ सकाळी आठ ते सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे.सदर वर्कशॉप हे व्यावसायिक फोटोग्राफर साठी असणार आहेत. हे वर्कशॉप पूर्णतः मोफत असून मर्यादित सीट साठी असल्याकारणाने नाव नोंदणी आवश्यक आहे या वर्कशॉप मधील फोटोशूट साठी मॉडेल्स उपस्थित असणार आहेत. पूर्णतः प्रॅक्टिकल वर्कशॉप असणार आहे .येणाऱ्या फोटोग्राफर साठी अल्पोपहारची व्यवस्था आयोजकांकडून केलेली आहे.
अधिक माहिती आणि नाव नोंदणीसाठी रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर असोसिएशनच्या तालुकाध्यक्ष तसेच पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे रत्नागिरी जिल्हा फोटोग्राफर व्हिडिओग्राफर असोसिएशनच्यावतीने कळवण्यात आले आहे.