व्यायाम : मुलांची उंची कमी असेल तर पालकवर्ग खूप चिंतेत असतो. आपल्या मुलाची उंची कशी वाढेल यासाठी प्रयत्न करत असतात.
मुलांची उंची वाढण्याबाबत तुम्ही चिंतेत असाल तर चिंता करण्याचं काहीच कारण नाही. ६ पद्धतीनं तुम्ही मुलांची उंची वाढवण्यात मदत करू शकता. याशिवाय मुलांचे मानसिक आरोग्यही चांगले राहील.
1) मुलांच्या एक्टिव्हीटीजमध्ये सायकलिंगचा समावेश करू शकता. ज्यामुळे मांसपेशी मजबूत बनतात आणि उंची वाढण्यास मदत होते.
2) बास्केट बॉल आणि वॉलीबॉल यांसारखे गेम मुलांची उंची वाढवू शकतात. जर तुमचं मूल रोज हे गेम खेळेल तर त्याची उंची वाढेल.
3) लटकण्याचा व्यायाम केल्यानं मुलांची स्ट्रेचिंग होईल आणि उंची वाढेल यामुळे मुलांच्या शरीराला आकारही चांगला येतो.
4) आपल्या मुलांच्या रुटीनमध्ये तुम्ही स्विमिंगचा समावेश करू शकता. यामुळे मुलांची फिजिकल स्ट्रेंथ आणि उंची वाढण्यास मदत होईल.
5) जॉगिंग केल्यानंरही मुलांची फिजिकल हेल्थ वाढते. दोरी उड्या यांसारखे व्यायाम केल्यानं मुलांची उंची वाढू शकते. यामुळे मुलांच्या मांसपेशसी मजबूत राहतात.
6) याव्यतिरिक्त योग्य प्रमाणात झोप घेतल्यास शारीरिक विकास होण्यास मदत होते. ज्यामुळे मुलांची उंची वाढेल आणि शरीर लवचीक होईल.