रत्नागिरी:-शिवसेनेकडून बंडखोरी करत रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दाखल करणारे उदय बने हे मंगळवारी झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभेला अनुपस्थित राहिल़े. अखेरच्या दिवशी बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी पक्षाकडून अन्याय झाल्याचे सांगत नाराजी व्यक्त केली होत़ी. त्यामुळे ठाकरे यांच्या सभेला बने उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले होत़े. अखेर बने हे या प्रचारसभेत अनुपस्थित राहल्याचेच दिसून आल़े. त्यामुळे रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत बने नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे आता लक्ष लागून राहिले आह़े.