रत्नागिरी:-रत्नागिरीत शिवेसेनेच्या दोन गटांचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. ते एकमेकांचे वर्षानुवर्षांचे प्रतिस्पर्धीही आहेत.
गेली वीस वर्षे आमदार असलेले उदय सामंत यांना एकनाथ शिंदे शिवसेना गटातर्फे पुन्हा उमेदवारी मिळाली आहे.
त्यांनी पहिली दहा वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रतिनिधित्व केले होते, तर गेली दहा वर्षे ते शिवसेनेचे आमदार तसेच विद्यमान उद्योग मंत्री आहेत. रत्नागिरीची जागा भारतीय जनता पक्षाला मिळावी, असा आग्रह कार्यकर्त्यांचा आग्रह होता. मात्र तो मान्य झाला नाही. तो मान्य होईल अशी असे गृहीत धरून भाजपचे माजी आमदार बाळ माने गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील होते. मात्र महायुतीच्या जागा वाटपात ही जागा पुन्हा एकदा विद्यमान आमदार उदय सामंत यांनाच दिली गेल्याने श्री. माने यांनी पक्षत्याग करून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. पक्षात प्रवेश केल्यानंतर लगेचच त्यांना उमेदवारी मिळाल्यामुळे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष उदय बने यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र त्यांनी आता माघार घेतली आहे. तरीही निवडणुकीपासून आपण अलिप्त राहणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या प्रचारावर येथील निवडणूक अवलंबून आहे वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणारे बाळ माने यांच्यासाठी छुप्या पद्धतीने काम करावे की युतीचा धर्म म्हणून उदय सामंत यांची यांचा प्रचार करावा अशा संभ्रमात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या निर्णयावर रत्नागिरीचे भवितव्य अवलंबून आहे.
रत्नागिरीतील उमेदवार असे – उदय रवींद्र सामंत – शिवसेना, बाळ माने – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), भारत सीताराम पवार – बहुजन समाज पार्टी, कैस नूरमहमद फणसोपकर- अपक्ष, कोमल किशोर तोडणकर – अपक्ष, ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील – अपक्ष, दिलीप काशिनाथ यादव -अपक्ष, पंकज प्रताप तोडणकर -अपक्ष.