गुहागर:-रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात भास्कर जाधव विरुद्ध राजेश बेंडल यांच्यात लढत होणार असून तेथे एकतर्फी लढतीची शक्यता आहे.
गुहागर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव निवडणूक लढवत आहेत.
त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी पंचायत समिती सभापती राजेश बेंडल शिवसेना एकनाथ शिंदे गटात दाखल झाल्यानंतर त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे पण भास्कर जाधव यांच्यापुढे त्यांचा टिकाव लागण्याची शक्यता वाटत नाही. भास्कर जाधव यांनी संपूर्ण मतदारसंघ बांधून घेतला आहे. त्यांचा गावागावांशी थेट संपर्क आहे. अनेक विकासकामे त्यांनी गावांमध्ये केली आहेत.
गुहागरमधील उमेदवार असे – गांधी प्रमोद सीताराम – महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जाधव भास्कर भाऊराव- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र- शिवसेना, प्रमोद परशुराम आंब्रे – राष्ट्रीय समाज पक्ष, फडकले संदीप हरी – अपक्ष, मोहन रामचंद्र पवार – अपक्ष, सुनील सखाराम जाधव – अपक्ष.