रत्नागिरी:-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उदय बने याने अपक्ष म्हणून दाखल केलेला उमेदवारी अर्ज काल मागे घेतला.
विधानसभा निवडणुकीसाठी दाखल केलेले उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल अखेरचा दिवस होता.
रत्नागिरीत मतदारसंघातून उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षातून आपल्याला उमेदवारी मिळावी, अशी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष उदय बने यांची अपेक्षा होती. मात्र भाजपचे माजी आमदार बाळ बाने यांनी निवडणुकीच्या तोंडावर त्या पक्षात प्रवेश केला आणि त्यांना उमेदवारीही मिळाली. त्यामुळे नाराज होऊन श्री. बने यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. आज शेवटच्या दिवशी त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. मात्र आपली नाराजी संपलेली .नाही आपण निषेध म्हणून हा अर्ज भरला होता. मी तो आता तो मागे घेतला आहे. मात्र यापुढे शिवसेना हा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. मी प्रचारात कोणताही सहभाग घेणार नाही. लोकांची सेवा करत राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.
श्री. बने यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात आता पालकमंत्री उदय सामंत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे बाळ माने यांच्यात सरळ लढत होणार आहे.