खेड:-तालुक्यातील खोपी येथे एकास शिवीगाळ करून लोखंडी सळीने बेदम मारहाण करत जखमी केल्याप्रकरणी विशाल विठ्ठल कदम (32) याच्यासह अन्य एकावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल सीताराम मोहिते यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.
हे तिघेजण मद्यप्राशन करण्याकरिता खोपी गावच्या नदीजवळ गेले होते. यादरम्यान किरकोळ कारणावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. याचे पर्यावसन हाणामारीत होवून दोन्ही संशयितांनी हातातील लोखंडी सळीने फिर्यादीस बेदम मारहाण केली. तसेच शिवीगाळ केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.