नवी दिल्लीः भारत पहिल्या बौद्ध आशियाई शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. भारत सरकारचे सांस्कृतिक मंत्रालय आणि आंतरराष्ट्रीय बौद्ध महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ५ आणि ६ नोव्हेंबर रोजी आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू करतील.
‘आशिया मजबूत करण्यात बौद्ध धर्माची भूमिका’ या विषयावर आधारित ही परिषद ठेवण्यात आली आहे.
बौद्ध धर्माचा प्रवास इसवी सनपूर्व ६ व्या शतकात सुरू झाला, जेव्हा सिद्धार्थ गौतम यांना ज्ञान प्राप्त झाले. गौतम बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर, त्यांच्या शिकवणींचे त्यांच्या अनुयायांनी जतन केले आणि प्रसार केला. मौर्य सम्राट अशोक यांनी बौद्ध धर्माचा प्रसार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बुद्धांच्या शिकवणींने शांतता, आनंद आणि सौहार्द वाढवून समाजात कसा बदल घडवून आणता येतो हे दाखवून दिले.
आशियाई बौद्ध शिखर परिषद भारत आणि आशियातील संबंध मजबूत करण्यासाठी काम करेल. ही शिखर परिषद भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसी आणि नेबरहुड फर्स्ट धोरणाच्या अनुषंगाने आहे. जे आशियातील सामूहिक, सर्वसमावेशक आणि आध्यात्मिक विकासावर लक्ष केंद्रित करते. ही दृष्टी लक्षात घेऊन, शिखर परिषद बौद्ध कला, वास्तुकला आणि वारसा, बुद्ध चारिका आणि बुद्ध धम्माचा प्रसार, पवित्र बौद्ध अवशेषांची भूमिका आणि समाजातील त्याची प्रासंगिकता, वैज्ञानिक संशोधनात बुद्ध धम्माचे महत्त्व आणि तसेच- जात, आणि २१ व्या शतकातील बौद्ध धर्म, साहित्य आणि तत्त्वज्ञानाशी संबंधित विषयांवर चर्चा केली जाईल. या परिषदेचे आयोजन करून, भारत देशाची बौद्ध धर्माच्या तत्त्वांप्रती असलेली वचनबद्धता सिद्ध होते. तसेच समकालीन समाजात बौद्ध धर्माचा विकास आणि प्रासंगिकता वाढविण्यात या परिषदेचे महत्व आहे.