खेड:-तालुक्यातील गुणदे-तलारीवाडी येथे बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर पोलिसांनी रात्री 11.30 वाजण्याच्या सुमारास धाड टाकून 6720 रूपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी एका महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही महिला गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळताच लोटे पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस कॉन्स्टेबल सुनील पडळकर यांनी धाड टाकून 65 लिटर गावठी हातभट्टीची दारू हस्तगत केली. यामध्ये इतर साहित्यांचा देखील समावेश आहे. शहरासह तालुक्यात बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या गावठी हातभट्टीच्या या दारूअड्डयावर धाडी टाकण्याचे पोलिसांचे सत्र सुरूच असल्याने व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत.