मुंबई:-महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाने आज (दि.४) मोठा निर्णय घेतला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे.
त्यांना राज्याच्या पोलिस महासंचालक या पदावरून हटवल्याचे वृत्त समोर आले आहे.
सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे महासंचालक पदाचा पदभार
काँग्रेस आणि इतर पक्षांच्या तक्रारींवरून केंद्रीय निवडणूक आयोगाने शुक्ला यांच्या बदलीचे आदेश दिल्याचे केंद्रीय आयोगाने स्पष्ट केले आहे. तसेच पोलीस महासंचालक शुक्ला यांची तत्काळ बदली करण्यात आली येत असून, पोलीस महासंचालकांचा पुढील पदभार सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्याकडे सोपवला आहे. यासाठी राज्याच्या मुख्य सचिवांना उद्या (दि.५) दुपारी १ वाजेपर्यंत पर्यंत तीन आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनेल पाठवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
निवडणूक आयोगने केला होता महाराष्ट्र दौरा
राज्यातील विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र दौरा केला होता. यावेळी आढावा बैठका घेण्यात आल्या. दरम्यान काँग्रेसह अनेक विरोधी पक्षांनी पोलीस महासंचालकांना हटवण्याची मागणी केली होती. राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या घोषणेच्यावेळी अधिकाऱ्यांना केवळ निष्पक्षपणे त्यांचे कर्तव्य पार पाडताना पक्षपातीपणा करू नये अशा इशारा देखील आयुक्तांनी दिला होता.