संगमेश्वर:-वनाझ इंजिनियर्स कामगार को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मार्फत शालेय मुलांना दिवाळी भेटवस्तू शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सामाजिक कार्याचा वारसा जोपासत वनाझ इंजिनियर्स कामगार सोसायटीमार्फत अतिदुर्गम भागातील धनगर वाड्यावरील मराठी शाळांमध्ये जाऊन दिवाळी साजरी करण्यात आली.
संगमेश्वर तालुक्यामध्ये मौजे दख्खन व मुर्शी यादोन्ही गावांमध्ये डोंगर माथ्यावर अतिदुर्गम भागामध्ये जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा आहेत . त्यातील मुर्शीच्या धनगर वाड्यावरील शाळेमध्ये पायी जंगलातून चालत जावे लागते. दोन्ही शाळांचा मिळून पट वीस आहे. मुलांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे अशा परिस्थितीमध्ये मुलांना मिळालेली ही भेट त्यांच्यासाठी अनमोल आहे. दख्खनच्या शाळेमध्ये श्री कोकरे व श्री लाड सर कार्यरत आहेत व मुर्शीच्या शाळेमध्ये श्री शेलार सर व घागरे सर कार्यरत आहेत यावेळी केंद्रप्रमुख यादव सर उपस्थित होते खास करून या कार्यक्रमाच्या वेळी संगमेश्वर तालुका शिक्षण विस्तार अधिकारी श्री नाईक सर आवर्जून उपस्थित होते त्यांनी या वनाझ सोसायटीच्या सामाजिक कार्याची स्तुती केली या दोन्ही शाळांच्या इतिहासामध्ये प्रथमच मुलांसाठी भेटवस्तू दुर्गम भागामध्ये स्वतः येऊन दिल्याबद्दल वनाझ परिवाराचे आभार मानले व पुढील प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाचे आयोजन वनाझ सोसायटीचे संचालक श्री शशांक शिंदे व श्री आनंद पवार यांनी केले. तसेच या कार्यक्रमासाठी वनाझ साडवली देवरूखचे असिस्टंट मॅनेजर श्री मंगेश सरदेसाई साहेब वनाझ युनियनचे प्रतिनिधी कमलेशजी माव्हळणकर व महेश संसारे उपस्थित होते.