राजापूर:-गेल्या काही महिन्यांपासून तालुक्यातील गोवळ-शिवणे परिसरातील जंगलभागासह लोकवस्तींमध्ये बिबट्याचा संचार आहे. बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये लोकवस्तीमध्ये असलेल्या गोठ्यांमध्ये घुसून जनावरांना बिबट्याने मारले आहे. याकडे वारंवार लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने बिबट्याकडून माणसांवर हल्ला झाल्यास त्याला वनविभाग जबाबदार राहील असा इशारा निवेदनाद्वारे गोवळचे सरपंच अभिजित कांबळे यांनी वनविभागाला दिला आहे.