रत्नागिरी:-गुरुवारी सायंकाळी रत्नागिरी तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वरवडे येथे 17 वर्षीय युवकाच्या अंगावर झाड कोसळल्याने जखमी झाल़ा. ही घटना गुरुवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास घडल़ी. ओजस सूर्यकांत कोलगे (17, रा. मालगुंड, ता. रत्नागिरी) असे जखमी मुलाचे नाव आहे. जखमी झालेल्या ओजस याला तातडीने रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालय येथे दाखल करण्यात आले.
ओजस हा वरवडे ते मालगुंड चालत जात असताना वरवडे येथील श्री गणपती मंदिरजवळ आल्यावर वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला. जोरदार वाऱ्याच्या वेगाने सुरुचे झाड तुटून रस्त्यावर जाणाऱ्या ओजसच्या अंगावर पडले. त्यामध्ये त्याला दुखापत झाली. नातेवाईकांनी ओजस याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, अशी नोंद पोलिसात करण्यात आली आहे.