खेड:-खाडीपट्टा मार्गावरील देवणं पुलावर येथील पोलिसांनी गांजा वाहतूकप्रकरणी जेरबंद केलेल्या मुस्तकिम जहागीर कादिरी (29), आतिफ रऊफ कादिरी (30, दोघेही रा. नांदगाव-मोहल्ला, खेड) यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता दोघांचीही प्रत्येकी 15 हजार रूपयांच्या जामिनावर सुटका करण्यात आली. संशयितांच्यावतीने ऍड. अश्विन भोसले, ऍड. सिद्धी खेडेकर यांनी काम पाहिले.
हे दोघेजण एम.एच.05/सी.ए.2436 क्रमांकाच्या टोयाटो कंपनीच्या इनोव्हा कारमधून गांजाची विक्री करण्यासाठी जात असताना पोलिसांच्या सापळयात अडकले होते. दोघांकडून 450 ग्रॅम वजनाचा 9 हजार रूपये किंमतीचा गांजा, 30 लाख रूपये किंमती इनोव्हा कार, 40 हजार रूपये किंमतिचे दोन मोबाईल असा असा 30 लाख 50 हजार रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला होता. दोघांनाही न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता ऍड. भोसले, ऍड. खेडेकर यांनी केलेला युक्तीवाद ग्राह्य धरत न्यायालयाने दोघांनाही जामीन मंजूर केला.