खेड:-तालुक्यातील भरणे व सुसेरी नं. 1 येथे गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यांवर पोलिसांनी धाडी टाकत दोघांना रंगेहाथ पकडले. भरणे येथील एका घरात गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळताच पोलीस पथकाने टाकलेल्या धाडीत 3,570 रूपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. संजय मधुकर जगदाळे (भरणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तो गावठी हातभट्टीच्या दारूची विनापरवाना विक्री करत होता. 30 लिटर गावठी हातभट्टीच्या दारूसह त्याला रंगेहाथ पकडले.
सुसेरी नं. 1-साठेवाडी येथेही पोलिसांनी गावठी हातभट्टीच्या दारूअड्डयावर धाड टाकली. या प्रकरणी संदेश विलास माने (रा. सुसेरी नं.1-साठेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्याकडून 7,010 रूपये किंमतीची 70 लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. या बाबत पोलीस शिपाई राहुल कोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. शहरासह ग्रामीण भागात बेकायदेशीरपणे सुरू असणाऱ्या गावठी हातभट्टीच्या दारूअड्डयावर धाडी टाकण्याचे पोलिसांचे सत्र सुरूच असल्याने व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.