दापोली:-दापोली तालुक्यातील करजगाव बिरबीवाडी येथील अनिल अनंत धोपट या 35 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना बुधवार 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.00 वाजण्याच्या सुमारास घडली.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल धोपट हे सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान करजगाव राम खरी नदीच्या किनारी असणाऱ्या आपल्या शेतामध्ये काम करीत होते. त्यावेळी शेताजवळ असणाऱ्या नदीवर ते गेले असता त्यांचा पाय घसरून ते रेवशाच्या डोहांमधील पाण्यात पडले. पाण्यात ते बुडाल्याने त्यांना तेथून उपचाराकरता उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यानी त्यांची तपासणी करून त्यांना मयत घोषित केले. दापोली पोलीस स्थानकात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.