रत्नागिरी : कानात मळ साचणे ही एक सामान्य समस्या आहे. कोणत्याही वयातील व्यक्तीला ही समस्या होऊ शकते. धूळ, प्रदूषण, तेल आणि डेड स्किनमुळे कानात मळ जमा होतो. नियमितपणे कान साफ केले नाही तर हा मळ आणखी साचून राहतो. त्यामुळे आपण कान सतत खाजवतो, कानात वेदना होते आणि इन्फेक्शनही होतं. बरेच लोक ईअर बडचा वापर करतात. पण त्याने कान पूर्णपणे साफ होत नाही. त्यामुळे अशा पद्धतीने वापर केलात तर कान व्यवस्थित साफ होईल.
१) गरम पाणी आणि कापडाचा वापर
गरम पाणी कान साफ करण्यासाठी सगळ्यात सोपा उपाय आहे. एका ग्लासमध्ये गरम पाणी घ्या आणि त्यात एक कापड भिजवा. कापड पिळून हळुवारपणे कानाच्या बाहेरचा भाग पुसून घ्या. कानात पाणी जाऊ देऊ नका. याने कानाच्या बाहेरील भागात असलेला मळ साफ होण्यास मदत मिळेल.
२) ऑलिव्ह ऑईल
ऑलिव्ह ऑईल कानातील मळ नरम करणे आणि बाहेर काढण्याचा एक नॅचरल उपाय आहे. याने कानाच्या आतील सूजही कमी होते. यासाठी या तेलाचे काही थेंब कानात टाका आणि डोकं काही वेळासाठी एका बाजूला झुकवा. जेणेकरून तेल कानात आतपर्यंत जाईल. ५ ते १० मिनिटांनी कान हळुवारपणे पुसून घ्या. याने कानातील मळ बाहेर येईल.
३) खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेलही एक चांगला पर्याय आहे. खासकरून जर कान खाजवत असेल किंवा जळजळ होत असेल. तेलाचे काही थेंब हलकं गरम करून कानात टाका. काही वेळासाठी डोकं एका बाजूला झुकवा. याने कानातील चिकटून बसलेला मळ मोकळा होईल आणि बाहेर येईल.
४) मिठाचं पाणी
मिठाचं पाणी कानाची सफाई करण्यासाठी एक सोपा आणि सुरक्षित उपाय मानला जातो. एक कप गरम पाण्यात अर्धा चमचा मीठ मिक्स करा. नंतर रूई मिठाच्या पाण्यात भिजवा आणि त्याने कानाच्या बाहेरील भागावर पाणी लावा. याने कानाच्या आतील मळ मोकळा होईल आणि बाहेर येईल.
वर सांगण्यात आलेले उपाय सोपे, प्रभावी आणि सुरक्षित आहेत. जर कानात खूप जास्त मळ जमा झाला असेल तर वेळीच डॉक्टरांना दाखवा.