मुंबई : दीपावलीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. परंपरेप्रमाणे श्री विठ्ठल आणि रुक्मिणीला ठेवणीतील हिरेजडित अलंकार परिधान करण्यात आले आहेत. विठ्ठल भक्तांनी मंदिरात रांगोळ्याच्या पायघड्याही घातल्या आहेत. विठ्ठल आणि रुक्मिणीला दागिने परिधान केल्यानं देवाचं रुप ‘सावळे सुंदर रुप मनोहर’ या उक्तीप्रमाणे अधिकच सुंदर दिसत आहे.
मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली असून दिवाळीनिमित्त विठ्ठल मंदिर विविध रंगाने उजळून निघाले आहे. दरवर्षी दिवाळी सणाच्या निमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदीरावर आकर्षक रोषणाई केली जाते. तसेच देवाला दागिणे परिधान केले जातात.