आरोग्य : लवंग व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, फायबर आणि पोटॅशियम सारख्या अनेक पोषक द्रव्यांनी समृध्द आहे. लवंग पाण्यात अँटी बक्तेरियल आणि अँटी व्हायरल गुणधर्म असतात. जे संसर्गापासून संरक्षण करतात. यामुळे सर्दी, खोकला, कफ, यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
लवंग पाण्याचा फायदा मिळवण्यासाठी रोज झोपण्यापूर्वी 4 लवंग एक ग्लास पाण्यात भिजवून सकाळी प्या. सकाळी सकाळीच लवंगाचे पाणी पोटात गेल्याने अँटी स
ऑक्सीईडंट शरीरात गेल्याने शरीरातील त्रिदोष संतुलित राहतात.
आयुर्वेदात वात, पित्त आणि कफ यांना सर्व आजारांचे मूळ मानले जाते. ज्यांना पोट, घसा, नाक आणि त्वचेचा त्रास होतो त्यांनी लवंग पाणी घेतल्यास दोष दूर होतो. सकाळी उपाशीपोटी लवंग पाणी घेतल्यास पचनक्रिया सुधारते. गॅस, ॲसिडिटी, सूज येणे, अपचन यासारखे दोष दूर होतात.