रत्नागिरी:- जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी केल्यानंतर पाच जागांसाठी ४५ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. येत्या ४ नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत असून त्यानंतरच अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
जिल्ह्यातील ५५ उमेदवारांनी अर्ज सादर केले होते. त्यापैकी रत्नागिरी वगळता अन्य चार मतदारसंघांमधून एकूण १० अर्ज अवैध, तर ४५ अर्ज वैध ठरले, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.
विधानसभा मतदारसंघ वैध अर्ज असे – दापोली – अबगुल संतोष सोनू (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), कदम योगेश रामदास (शिवसेना), कदम संजय वसंत (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), मर्चंडे प्रवीण सहदेव (बहुजन समाज पार्टी), कदम योगेश रामदास (अपक्ष), कदम योगेश विठ्ठल (अपक्ष), कदम संजय सीताराम (अपक्ष), कदम संजय संभाजी (अपक्ष), खाडे सुनील पांडुरंग (अपक्ष), खांबे ज्ञानदेव रामचंद्र (अपक्ष).
गुहागर – गांधी प्रमोद सीताराम (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), जाधव भास्कर भाऊराव (शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे), बेंडल राजेश रामचंद्र (शिवसेना), प्रमोद परशुराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष), फडकले संदीप हरी (अपक्ष), मोहन रामचंद्र पवार (अपक्ष), सुनील सखाराम जाधव (अपक्ष), संतोष लक्ष्मण जैतापकर (अपक्ष), संदेश दयानंद मोहिते (अपक्ष).
चिपळूण – प्रशांत बबन यादव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरद्चंद्र पवार), शेखर गोविंदराव निकम (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अनघा राजेश कांगणे (अपक्ष), नसिरा अब्दुल रहमान काझी (अपक्ष), प्रशांत भगवान यादव (अपक्ष), महेंद्र जयराम पवार (अपक्ष), शेखर गंगाराम निकम (अपक्ष), सुनील शांताराम खंडागळे (अपक्ष).
रत्नागिरी – उदय रवींद्र सामंत (शिवसेना), भारत सीताराम पवार (बहुजन समाज पार्टी), सुरेंद्रनाथ यशवंत माने – (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), उदय विनायक बने (अपक्ष), कैस नूरमहमद फणसोपकर (अपक्ष), कोमल किशोर तोडणकर (अपक्ष), ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील (अपक्ष), दिलीप काशिनाथ यादव (अपक्ष), पंकज प्रताप तोडणकर (अपक्ष).
राजापूर – किरण रवींद्र सामंत (शिवसेना), जाधव संदीप विश्राम (बहुजन समाज पार्टी), राजन प्रभाकर साळवी (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे), अमृत अनंत तांबडे (अपक्ष), अविनाश शांताराम लाड (अपक्ष), राजश्री संजय यादव (अपक्ष), राजेंद्र रवींद्रनाथ साळवी (अपक्ष), संजय आत्माराम यादव (अपक्ष), यशवंत रामचंद्र हर्याण (अपक्ष).