सिंधुदूर्ग:-विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचार संहिता लागू करण्यात आली आहे. ही निवडणूक निर्भय, शांततेत आणि न्याय वातावरणात पार पाडावी यासाठी रेल्वेतून होणारी अवैध दारू, शस्त्र, रोख रक्कम, अमली पदार्थ व इतर वाहतूक यावर प्रभावी कारवाई होणे आवश्यक आहे.
त्यासाठी कुडाळ पोलीस प्रशासनाकडून कुडाळ रेल्वे स्थानकात येणाऱ्या गाड्यांची तपासणी करण्यात आली. यामध्ये मुंबईकडे जाणाऱ्या आणि मुंबईहून येणाऱ्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांच्या सामानाची तपासणी करण्यात आली. पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग सौरभकुमार अग्रवाल यांच्या आदेशानुसार आणि कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेत कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सहायक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे, पोलीस देवानंद माने, महिला हेड कॉन्सस्टेबल एल. एल. जाधव, पीसी स्वप्नील चव्हाण, हेड कॉन्सस्टेबल संजय कदम, हेड कॉन्सस्टेबल हरेश पाटील, सीआयएएसएफ पीआय आवरी अप्पान आणि टीम यांनी सहभाग घेतला.