नवी दिल्ली : मुंबई इंडियन्सच्या संघाने खेळाडूंना कायम ठेवताना एक मोठा निर्णय घेतला आहे. कारण मुंबई इंडियन्सने ज्या खेळाडूंना कायम ठेवले आहे, ते पाहता सर्वांनाच मोठा धक्का दिला आहे. मुंबई इंडियन्सच्या संघाने रोहित शर्मा आणि हार्दिक पांड्या या दोघांनाही धक्का दिला आहे. कारण त्यांनी जसप्रीत बुमराहला प्रथम रिटेन करण्याचा मान मिळाला आहे. त्यानंतर मुंबईने सूर्याला रिटेन केले आहे. त्यानंतर मुंबईने हार्दिक आणि रोहित यांना अनुक्रमे रिटेन केले आहे. तिलक वर्मा हा मुंबई इंडियन्सचा रिटेन केलेला पाचवा खेळाडू असणार आहे.
मुंबई इंडियन्सने गेल्या आपीएलमध्ये एक मोठा निर्णय घेतला होता. रोहित शर्मा हा मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार होता. पण मुंबई इंडियन्सने त्यावेळी आपला कर्णधार बदलण्याचा मोठा निर्णय घेतला होता. मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याला कर्णधार केले, पण त्यानंतर चाहत्यांनी मुंबई इंडियन्सला जोरदार ट्रोल केले. हार्दिक तर प्रत्येक सामन्यात जोरदार ट्रोल होत होता. हार्दिक कर्णधार झाला आणि त्यानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाची चांगली कामगिरी झाली नव्हती. कारण मुंबई इंडियन्स हा स्पर्धेतून बाहेर पडणारा पहिला संघ ठरला होता. त्यामुळे मुंबईच्या संघावर नामुष्की ओढवली होती.
मुंबई इंडियन्स पुढच्या वर्षासाठी आपला कर्णधार बदलणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे आता मुंबई इंडिन्सचा पुढचा कर्णधार होणार तरी कोण, याची उत्सुकता सर्वांना आहे. हार्दिक पांड्याकडे जर संघाचे कर्णधारपद जाणार नसेल तर त्याच्यासाठी कोणते पर्याय असतील, हे सर्वात महत्वाचे असेल. रोहित शर्माकडे पुन्हा एकदा कर्णधारपद येणार का, याची उत्सुकता सर्वांना असणार आहे. पण जर रोहित शर्माला मुंबई इंडियन्सला कर्णधार करायचे नसेल तर त्यांच्यासाठी सूर्यकुमार यादव हा एक चांगला पर्याय असल्याचे म्हटले जात होते. कारण सूर्या हा भारताच्या टी २० संघाचाही कर्णधार आहे. त्यामुळे सूर्या हा मुंबई इंडियन्सच्या संघाचा नवा कर्णधार होऊ शकतो, असे बोलले जात आहे. पण त्यासाठी मुंबई इंडियन्सचा संघ या तिघांपैकी कोणाला रिटेन करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे.