संगमेश्वरसह चिपळूणच्या सर्वांगीण विकासाचा गाव विकास समितीकडून संकल्प
देवरुख:- गाव विकास समितीच्या वतीने चिपळूण- संगमेश्वर मध्ये उमेदवार मैदानात उतरवण्यात आला असून अनघा कांगणे यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरल्यानंतर गुरुवारी मार्लेश्वरचे दर्शन घेऊन गाव विकास समितीच्या वतीने प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड यांच्या नेतृत्वाखाली गाव विकास समितीने प्रचाराचा शुभारंभ केला.
गाव विकास समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी मार्लेश्वरचे दर्शन घेत गाव विकास समितीचे विकासाचे व्हिजन मार्लेश्वर चरणी मांडत आशीर्वाद घेतले. संगमेश्वर तालुक्यासह चिपळूणचा विकास याचा निर्धार गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड , संघटन प्रमुख सुहास खंडागळे, उपाध्यक्ष राहुल यादव, उमेदवार अनघा कांगणे,दिक्षा खंडागळे- गिते व महिला पदाधिकारी यांनी मार्लेश्वरचे दर्शन घेऊन केला. यावेळी गाव विकास समितीचे चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रभारी एडवोकेट सुनील खंडागळे, राजेश कांगणे, सरचिटणीस डॉक्टर मंगेश कांगणे, महेंद्र घुग सर आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.