देवरुख:-कौशल्य विकास भारत सरकारतर्फे 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत देवरूख येथे लाईफगार्ड सर्टिफिकेट कोर्सचे मोफत आयोजन करण्यात आले आहे.
दिवाळी सुट्टी योग्य रितीने उपयोगात यावी, या हेतूने शहरातील नक्षत्र मंगल कार्यालय खाली आळी येथे 4 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी 10 ते सायं. 6 या वेळेत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. अडचणीच्या वेळी दुसऱ्याला मदत करताना स्वत: प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा उपयोग स्वत व दुसऱ्याचा जीव वाचवण्यासाठी होणार आहे. या प्रशिक्षणासाठी प्रवेश मर्यादित असून 10 वी पास असणाऱ्या 18 ते 45 वयोगटातील स्त्री-पुरूषांना यामध्ये सहभागी होता येणार आहे. प्रवेशासाठी आधारकार्ड, 10 वी सर्टिफिकेट, पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्राची आवश्यकता आहे. प्रशिक्षण पूर्ण करताच 15 हजारचे लाईफगार्ड कीट देण्यात येणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांनी स्पष्ट केले आहे. अधिक माहितीसाठी 9422351926 यांच्याशी संपर्क साधावा, असे सूचित करण्यात आले आहे.