रत्नागिरी : कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरीच्या श्रुती काळे हिने पुन्हा रत्नागिरीचे नाव उंचावले. 19 वर्षाच्या आतील 40 किलो वजनी गटात श्रुती काळे हिने कांस्य पदकाची कमाई केली.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या विद्यमाने आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सांगली व जिल्हा क्रीडा परिषद सांगली यांच्यावतीने कोल्हापूर विभागीय शालेय तायक्वांदो क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वारणा मंगल कार्यालय मार्कट यार्ड सांगली येथे 26 व 27 ऑक्टोबर रोजी या स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धेत युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर साळवी स्टॉप शाखा येथे प्रशिक्षण घेणारी व जुलेख दाउत काजी महाविद्यालय पावस रत्नागिरी या प्रशालेत 11 वी इयत्तेत शिक्षण घेणारी श्रुती संतोष काळे हिने 19 वर्ष आतील मुलीच्या वयोगटात 40 किलो आतील वजनी गटात कास्य पदक पटकावले. श्रुती हिला तायक्वांदोचे तज्ञ प्रशिक्षक राम कररा यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.