रत्नागिरी:-नजीकच्या मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीच्या छतावरुन कोसळून तरुणाचा मृत्यू झाल़ा. ही घटना मंगळवारी सायंकाळी 7.30 च्या सुमारास घडल़ी. अभिजित आत्माराम शेलार (35, ऱा कसोप-तेलीवाडी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसांत करण्यात आली आहे.
अभिजित हा 29 ऑक्टोबर रोजी सकाळी मिरजोळे एमआयडीसी येथील कंपनीत कामाला आला होता. कंपनीच्या छतावर काम करत असताना अचानक पत्रा तुटल्याने अभिजित हा खाली कोसळला. या घटनेत त्याला गंभीर स्वरुपाची दुखापत झाल्याने उपचारासाठी शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला, अशी नोंद रत्नागिरी ग्रामीण पोलिसात करण्यात आली आहे त्याच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगी, दोन भाऊ, वहिनी असा परिवार आहे.