चिपळूण:-तालुक्यातील मालघर परिसरात 4,690 रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रौढावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अनिल वसंत आग्रे (40, रामपूर) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. या बाबतची फिर्याद कृष्णा अश्रुबा दराडे यांनी दिली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यावसायिकांवर चिपळूण पोलिसांची धडक कारवाई सुरु केली आहे. असे असताना मालघर परिसरात अनिल आग्रे याने विदेशी दारुचा विक्रीच्या उद्देशाने साठा करुन ठेवल्याची गोपनीय माहिती चिपळूण पोलिसांना समजली होती. त्यानुसार पोलिसांनी टाकलेल्या धाडीत आग्रे याच्याकडून 4,690 रुपये किंमतीचा विदेशी दारुसाठा जफ्त करण्यात आला.