खेड:-तालुक्यातील पोयनार-बौद्धवाडी येथे पोलिसांनी धाड टाकून 3,550 रूपयांचा ऐवज हस्तगत केला. या प्रकरणी सुजित सीताराम मोगरे (45) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तो गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी धाड टाकून रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून 35 लिटर गावठी हातभट्टीची दारू पोलिसांनी जप्त केली. या बाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश पवार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.