रत्नागिरी:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाक्यावर नाक्यावर पोलीसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे.
जिल्ह्यात ठीक ठिकाणी स्थिर सर्वेक्षण पथकांकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभुमीवर उक्षी चेक पोस्ट येथे वाहनाची कसून तपासणी करण्यात येत आहे. ही तपासणी दिवस रात्र करण्यात येत आहे.
आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने दि. १५/१०/२०२४ रोजी पासुन संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहीता लागु करण्यात आलेली आहे. त्या अनषंगाने मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे, कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी अवैध दारू,रोकड,शस्त्र त्याचबरोबर जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाली आहे.आणि प्रत्येक वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे.
उक्षी चेक पोस्ट येथे चार चाकी वाहने,टेम्पो,ट्रक,रिक्षा तसेच अन्य संशयास्पद वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. आणि या तपासणीचे व्हिडिओ शूटिंग सुद्धा करण्यात येत आहे.
या ठिकाणी सुबोध सावंत आणि पोलिस कॉन्स्टेबल मंदार कोळंबेकर,अशोक घोळवे, कॅमेरामन साहिल घाणेकर आपले कर्तव्य बजावत आहेत.