खेड /प्रतिनिधी:- मुंबई-गोवा महामार्गावरील भोस्ते घाटात कारने पेट घेतल्याने हाहाकार उडाला. पेटत्या गाडीतून दोघांनी उड्या मारल्याने दोघेही बचावले आहेत.
सविस्तर वृत्त असे की, बुधवार 30 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास एक कार रत्नागिरीतून मुंबईच्या दिशेने जात होती. भोस्ते घाटात आल्यानंतर या कारने पेट घेतला. कारमधून धूर येत असल्याचे लक्षात आल्यानंतर ड्रायव्हरने दुसऱ्या व्यक्तीला उडी मारण्यास सांगितले. त्यानंतर काही क्षणातच कार जळून भस्मसात झाली.
यामुळे दोघेही बचावले. जीवितहानी टळली असली तरी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली. अपघातामुळे घाटात एकेरी वाहतूक काही काळ ठप्प झाली. घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. गाडीचे व आतील सामना जळून खाक झाले आहे.