27 पर्यंत विविध कार्यक्रम, संजीवनी गाथा अभंग गायन, वक्तृत्व स्पर्धा
रत्नागिरी : तालुक्यातील पावस येथील प. पू. स्वामी स्वरूपानंदांचा 122 वा जन्मोत्सव सोहळा 22 डिसेंबर ते 27 डिसेंबर या कालावधीत साजरा होणार आहे. 27 डिसेंबर हा प.पू. स्वामीजींचा 122 वा जन्मदिन आहे. दरम्यान 7 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2.30 वाजता स्वामी स्वरूपानंद आंतर राज्यस्तरीय उच्च व कनिष्ठ महाविद्यालय वत्तृत्व स्पर्धा दुपारी 3.00 वाजता समारोप व पारितोषिक वितरण अद्वयानंद सरस्वती यांच्या हस्ते गोगटे – जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथे होणार आहे. तसेच 7 डिसेंबर रोजी सकाळी 8.30 वाजता शहरातील बियाणी बालमंदिर बालगट पठण स्पर्धा होणार आहेत.
15 डिसेंबर प.पू. स्वामीजींचा तारखेप्रमाणे जन्मोत्सव साजरा होणार आहे.सकाळी 8 वा. गोदुताई जांभेकर विद्यालयाच्या मुलांची बालदिंडी लक्ष्मी चौक ते अध्यात्म मंदिर अशी जाणार आहे. शायंकाळी 7 वाजता वरची आळी अध्यात्म मंदिर येथे प्रणव गोखले यांच्या हस्ते श्री क्षेत्र पावस षण्मासिकाचे प्रकाशन व प्रवचन होणार आहे.
22 डिसेंबर रोजी सकाळी 4.30 ते 9.30या कालावधीत अनंत आगाशे रत्नागिरी यांची रत्नागिरी ते पावस पायी दिंडी येणार आहे. जन्मोत्सव सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम 22 ते 26 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 ते 12 वा. प.पू. स्वामी स्वरूपानंद यांच्या ग्रंथांचे पठण. मनोज जोशी यांच्या उपस्थितीत रात्री 8.30 वाजता श्री हरिपाठ होणार आहे.
22 रोजी धनश्री कुलकर्णी (पुणे) यांचे दुपारी 4 वाजता अभंग गायन होणार आहे. 23 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता राज्यस्तरीय श्रीमंत संजीवनी गाथा अभंग गायन स्पर्धा अंतिम फेरी संपन्न होणार आहे.
24 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 2 वाजता कै.र.वा. तथा भाऊराव देसाई स्मृती प्रित्यर्थ जिल्हास्तरीय शालेय वत्तृत्व व पाठांतर स्पर्धा होणार आहेत. दुपारी 4 वाजता सौ अभिनेत्री गात यांचे अभंग गायन होणार आहे. 25 डिसेंबर रोजी रत्नागिरी येथील विशाखा भिडे यांचे दुपारी 4 वाजता कीर्तन होणार आहे. 26 डिसेंबर रोजी राजापूर येथील गिरीजा गिरीष करंबेळकर यांचे दुपारी चार वाजता कीर्तन होणार आहे. रात्री 8 वाजता रोहित कुमार फाटक (कोल्हापूर) यांचे अभंग गायन होणार आहे.
27 रोजी जन्मदिनी पहाटे 3 वाजता काकड आरती पहाटे 4 वाजता समृद्ध पूजा 6 वाजता आरती पावस गावातील प्रमुख देवस्थाने पूजा व मंत्राभिषेक होणार आहे. शकाळी 9 वाजता मुख्य दिंडी कार्यक्रम अनंत निवास ते श्री स्वामी मंदिर अशी असेल. सकाळी 10.च्या आरतीनंतर महाप्रसादाला सुरुवात होईल. दुपारी 11 ते 12 पुणे येथील रवींद्र देवधर यांचे ’मी भारतीय’ (दीर्घांक) दुपारी 12ः30 ते 1.30वा. श्रीमती हार्दिका संदेश फडके पुणे व सहकारी यांचे भरतनाटय सादर होणार आहे. दुपारी 1.30 ते 2.30 मुंबई येथील प्रार्थना केंद्र यांचे संजीवनी गाथेवरील कार्यक्रम सादर होणार आहे. दुपारी 2.30 ते 3.00 वाजता कोल्हापूर येथील उत्तरेश्वर भजनी मंडळ यांचे भजन होणार आहे. दुपारी 3 वाजता कैरवा तथा भाऊराव देसाई वकृत्व स्पर्धा सादरीकरण स्वामी स्वरूपानंद पारितोषिक वितरण (कै.मीनाक्षी वसंत देसाई) स्मरणार्थ संपन्न होणार आहेत. दुपारी 3.00ते 4.00 वाजता सांगरूळ येथील साई गणेश मंडळ यांचे लेझिम पथकाचा कार्यक्रम होणार आहे. सायंकाळी पाच वाजता जन्माचे कीर्तन हभप अवधूत बुवा टाकळीकर यांचे कीर्तन होणार आहे. जन्मवेळ सायंकाळी 7.39 आहे. जन्मदिनी रात्री 9 वाजता प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे यांचे अभंग गायन होणार आहे. सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे कार्याध्यक्ष जयंत रघुनाथ देसाई यांनी केले आहे.