रत्नागिरी : शहरातील साळवी स्टॉप झोपडपट्टी व तालुक्यातील चांदोर तळीवाडी येथे विनापरवाना दारु बाळगणाऱ्या संशयितांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. रविवारी पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आल़ी. सुरज शांताराम कांबळे (27) व महेंद्र मारुती चव्हाण (39) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत़.
शहरातील साळवी स्टॉप परिसरात अवैधरित्या दारु विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होत़ी. त्यानुसार 27 ऑक्टोबर रोजी पोलिसांनी छापा टाकून कारवाई केल़ी. यावेळी सुरज कांबळे यांच्या ताब्यात पोलिसांना 8 लिटर गावठी दारु आढळून आल़ी तर चांदोर तळीवाडी येथे महेंद्र चव्हाण याच्या ताब्यात पोलिसांना देशी विदेशी मद्य आढळून आले अशी नोंद करण्यात आली आह़े. दोन्ही संशयितांविरुद्ध पोलिसांनी महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 ई नुसार गुन्हा दाखल करण्यात आला