खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळनजीक 70 हजार रुपये किंमतिच्या गुटखा वाहतूकप्रकरणी खेड पोलिसांनी जेरबंद केलेल्या फरहान फारूख मोहम्मद पटेल (गोवळकोटरोड-पेठमाप,चिपळूण) या संशयितास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तो आपल्या ताब्यातील एम. एच.02/बी.जे. 3329 क्रमांकाच्या मारूती सुझुकी कारमधून गुटख्याची बेकादेशीरपणे वाहतूक करत असताना पोलीस पथकाने गजाआड केले आहे. पोलिसांच्या धडक कारवाईने बेकायदेशीरपणे गुटखा वाहतुकीसह विक्री करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. गुटखा नेमका कुठून आणला आणि कुठे घेऊन जात होता याही पोलिसांकडून पडताळा घेतला जात आहे.