खेड:-मुंबई-गोवा महामार्गावरील खोपीफाटानजीक गस्तीदरम्यान पोलीस पथकाने जनावरे वाहतूक करणाऱ्या समीर अशोक पवार (34) याला रंगेहाथ पकडले. गुरे वाहतुकीसाठी वापरलेला सात लाख रुपये किमतीचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे.
पवार हा महिंद्रा पिकअप बोलेरोतून (एमएच-06/बीजी-3622) जनावरे वाहतुका कोणताही परवाना नसताना व वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र नसतानाही एक मोठी म्हैस व दोन रेडयाना त्रास होईल, अशा स्थितीत दाटीवाटीने डांबून वाहतूक करत होता, असा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. 60 हजार रुपये किमती गाभण म्हैस व 40 हजार रुपये किमतीचे दोन रेडे हौद्यात बंदिस्त करून ठेवले होते.
गस्तीदरम्यान टेम्पोची झडती घेण्यात आली असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून याबाबत महिला पोलीस शिपाई तेजस्विनी जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. याबाबतचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन भोयर करत आहेत.