बिगबॉस व्हिनर/रिलस्टार शिव ठाकरे यांची विशेष उपस्थिती
गुहागर/उदय दणदणे:-महाराष्ट्र नवनिर्माण सेना गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी आज मोठे शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
गुहागर तालुका मनसे कार्यालय येथून सकाळी मनसे सैनिकांच्या तसेच मतदारसंघातील जनतेच्या उत्स्फूर्त अशा गर्दीत भव्यदिव्य अशी रॅलीचे प्रदर्शन करत गुहागर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून, पुष्पहार अर्पण करून दुपारी गुहागर तहसीलदार कार्यालय येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना गांधी म्हणाले की “आमच्या समोर कितीही बलाढ्य पक्ष लअसुद्या आम्ही आमचे बलाढ्य नेते राजसाहेब ठाकरे यांना मानतो,आणि ती बलाढ्य शक्ती आमच्या पाठी असताना आम्ही कधी कुणाला घाबरत नाही. असे म्हणाले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा स्वबळावर लढणारा पक्ष आहे,स्वतःच्या स्वार्थासाठी एक शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या, एक राष्ट्रवादीच्या दोन राष्ट्रवादी झाल्या त्यामुळे मतदार सुजाण व सहजक आहे,त्याला कळतंय सत्तेच्या लालसेपोटी याठिकाणी कोण कुणाच्या पक्षामध्ये गेला या गुहागर मतदारसंघातील मूलभूत गरजा आजही तशाच उभ्या आहेत,येथील, पाणी,रोजगार, रस्ते,महिला विषयी अनेक समस्या आहेत,एन्रॉन प्रकल्प, क्रस्टल हायवे,दळण वळणाच्या समस्या आहेत असे अनेक प्रश्न या मतदारसंघात आहेत,त्यामुळे मला ठाम विश्वास आहे.लोकसभेला ज्याप्रकारे मतदारांनी मतदान केले,बलाढ्य पक्षाविरोधात स्थानिकांनी उभे राहून लोकसभेच्या निवडणुका जिंकल्या त्याच पद्धतीने याठिकाणी पुनरावृत्ती होईल.
वैभव खेडेकर- मनसे नेते
यावेळी वैभव खेडेकर मनसे नेते,रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष संतोष नलावडे, उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर तालुका अध्यक्ष सुनिल हळदणकर सह मनसे कार्यकर्ते, पदाधिकारी, मनसे सैनिक, महिला वर्ग हजारोंच्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.