रत्नागिरी:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर नाक्यावर नाक्यावर पोलीसांकडून वाहनांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान २६ ऑक्टोबर रोजी पेट्रोलिंग करत असताना हातखंबा येथे गोवा बनावटीच्या दारुसह 87 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
आगामी सार्वत्रीक विधानसभा निवडणूक २०२४ चे अनुषंगाने दि. १५/१०/२०२४ रोजी पासुन संपूर्ण महाराष्ट्रात आदर्श आचारसंहीता लागु करण्यात आलेली आहे. त्या अनषंगाने मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी यांनी रत्नागिरी जिल्ह्यात चालणारे अवैध धंदे, कारवाई करण्याबाबतच्या सुचना दिलेल्या आहेत.
त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रत्नागिरी येथील पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे व इतर पोलीस अधिकारी व अंमलदार हे दि. २६/१०/२०२४ रोजी रात्री पासुन महामार्गावर पेट्रोलींग करुन वाहनाची तपासणी करीत होते. दरम्याने गोपनीय बातमीच्या आधारे दि.२७/१०/२०२४ रोजी गोवा ते मुंबई जाणारे हायवेवर वाहनांची तपासणी करीत असताना खानु गावातील ब्राम्हणवाडी या ठिकाणी २ चारचाकी गाड्या उभ्या असल्याच्या दिसुन आल्या सदर गाडयांचा संशय आल्याने त्यांच्या जवळ जावून त्यात असलेल्या इसमांकडे चौकशी करुन दोन्ही गाडयांची तपासणी केली असता त्यामध्ये गोवा बनावटी दारुचे बॉक्स भरलेले दिसुन आले.
त्यानुसार सदर दोन्ही गाडीचे चालक १) अक्षय चंद्रशेखर घाडीगांवकर, वय २९, रा. मालवण, जि. सिंधुदुर्ग व २) विजय प्रभाकर तेली, वय ३२, रा. कणकवली, जि. सिंधुदुर्ग यांचे ताब्यातुन रु. ८७,९३,७६०/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला असुन रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. पोलीस अधीक्षक, रत्नागिरी व अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. नितीन ढेरे, पोलीस निरीक्षक स्थागुअशा रत्नागिरी, पोऊनि श्री. गावडे, सपोफी / पांडुरंग गोरे, पोहवा / सुभाष भागणे, नितीन डोमणे, बाळू पालकर, शांताराम झोरे, विक्रम पाटील अमित कदम, विवेक रसाळ, भैरवनाथ सवाईराम, प्रविण खांबे, गणेश सावंत, सत्यजित दरेकर, अतुल कांबळे, दत्तात्रय कांबळे स्थागुअशा रत्नागिरी, यांनी केलेली आहे. सदर कारवाईचेवेळी रत्नागिरी ग्रामिण पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी मदत केलेली आहे.