दैव बलवत्तर म्हणून 79 वर्षीय वृद्ध बचावले
संगमेश्वर / एजाज पटेल:- मुबंई -गोवा महामार्गांवर संगमेश्वर येथे आयशर टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना रविवार 27 ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. दुचाकीवरून उडी मारल्याने सुदैवाने या अपघातात 79 वर्षीय वृध्द बचावले. अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती.
सविस्तर वृत्त असे की, आयशर टेम्पो (MH01E1851) हा चालक निझाम अहमद सफीउल्ला खान (उत्तर प्रदेश ) घेऊन मुबंईच्या दिशेने जात होता. संगमेश्वर एसटी स्टँड पासूनजवळ असलेल्या सॉमिल समोर हा टेम्पो चालक विरुद्ध दिशेने गाडी चालवत असताना कसबा येथील हशमत अली अहमद कापडी (79) हे आपल्या ताब्यातील दुचाकी ( MH08AC/2459) यांची आयशरला धडक बसली. यावेळी हशमत अली अहमद कापडी यानी गांभीर्य ओळखून जीव वाचवण्यासाठी दुचाकी सोडून रस्त्याच्या बाजूला उडी मारली. म्हणुन ते बचावले. मात्र त्यांना किरकोळ दुखापत झाली.
अपघाताची माहिती मिळताच संगमेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरक्षक प्रशांत शिंदे, पोलीस हेड कॉन्सटेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून महामार्गांवर दोन्ही बाजूला खोळंबलेली वाहतूक मार्गस्थ केली.