खेड : शहरातील भाऊसाहेब पाटणे संकुलासमोर उभ्या असलेल्या दुचाकीची डिकी तोडून 60 हजार रूपये लंपास केल्याप्रकरणी दोन अज्ञात चोरट्यांवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अमेय सुभाष पाटणे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
त्यांनी एम.एच.08/ए.यु. 5067 क्रमांकाची दुचाकी भाऊसाहेब पाटणे व्यापारी संकुलासमोरील बालाजी स्टुडिओसमोर उभी करून ठेवली होती. पतसंस्थेच्या मुख्य कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी ते गेले असता पल्सर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी पाटणे यांच्या दुचाकीची डिकी तोडून आतील 60 हजार रूपयांसह पलायन केले. रोकड लंपास झाल्याचे लक्षात येताच पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.