तुषार पाचलकर / राजापूर
ओणी येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ओझर विभागअध्यक्ष श्री शंकर पटकारे यांचा आपल्या कार्यकर्त्यांसमवेत राजापूर – लांजा – साखरपा विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार डॉ. राजन साळवी, उपतालुकाप्रमुख विश्वनाथ लाड, विभागप्रमुख वसंत जड्यार, उपविभागप्रमुख नागेश बने, युवासेना राज्य कॉलेज कक्षप्रमुख अथर्व साळवी, युवासेना रत्नागिरी जिल्हा संघटक दुर्गेश साळवी, तालुका संपर्क प्रमुख संदेश मिठारी, तालुका युवा अधिकारी सुरेश ऐनारकर, उपतालुका युवा अधिकारी सुभाष सुर्वे, उपविभाग युवा अधिकारी सूर्यकांत चव्हाण तसेच चंद्रकांत जड्यार राजाराम दोडये यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश पार पडला.
विभागातील बापू कुर्ले, आर्यन मोरे, प्रदीप मटकर,अयान वाघू, मलिक,फैझान कासु, संकेत पळसमकर, कुणाल, रोहित, सुहास, अरिफ, सुहास आमटे, दत्तात्रेय चौघुले, विनोद पालकर, तुषार कर्ले इत्यादी यांनी इतर पक्षातून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात आमदार डॉ. राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली जाहीर पक्ष प्रवेश केला. या पक्ष प्रवेशामुळे ओणी पंचक्रोशीतील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला या निवडणुकीत बळकटी मिळाली आहे.