जैतापूर : मौजे- भालावली ता राजापूर येथे पांडुरंग गणेश केळकर यांचे मालकी जागेत आंब्याच्या झाडावर 20 फुट अंतरावर तारेमध्ये बिबट्या अडकल्याची माहिती अमोल नार्वेकर यांनी शनिवारी दुपारी २.१० वा. परिमंडळ वन अधिकारी राजापूर यांना दूरध्वनी वरून दिली. ही घटना परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार यांना कळवून, त्यांचे समवेत डॉ.श्री स्वरूप काळे,पशुधन विकास अधिकारी रत्नागिरी, डॉ.श्री संतोष भिकाजी वाळवेकर, वन्यजीव पशुवैद्यक व पशुशल्य चिकित्सक कोल्हापूर, अमित कुंभार, तेजस कांबळे, कोल्हापूर वनपाल राजापूर, वनरक्षक राजापूर व रेस्क्यू टीमसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तारेच्या फासकित अडकलेल्या बिबट्या हा आंब्याच्या झाडावर साधारण 20 ते 25 फुट उंचावर सकाळपासून अडकलेल्या स्थितीत असल्याचा अंदाज आला.
या बिबट्याला रेस्कु करणेसाठी ट्रक्युलाईन गनचा वापर करून रेस्कु करणे जागेवरील परिस्थिती नसल्याने व बिबट्या सुस्थितीत असल्याचे पशुधन विकास अधिकारी, वन्यजीव पशुवैद्य व पशुशल्य शल्यचिकित्सक , तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी खात्री केली व रात्री 9.30 वाजण्याच्या दरम्यान रेस्कु टीमचे श्री शिंदे वनरक्षक यांचे मदतीने बिबट्यास अडकलेली तार कट करताच काही सेकंदात बिबट्या नैसर्गिकरीत्या अधिवासात निघून गेला, सदर बिबट्या हा नर जातीचा असून त्याचे वय अंदाजे एक ते दिड वर्ष आहे.
रेस्कुची कार्यवाही मा. विभागीय वनअधिकारी रत्नागिरी (चिपळूण) श्रीमती गिरिजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक चिपळूण श्रीमती प्रियांका लगड , यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बिबट्यास त्याचे नैसर्गिक अदिवासात मुक्त करण्यात आले.
सदर कामगिरीसाठी वनक्षेत्रपाल रत्नागिरी श्री.प्रकाश सुतार, वनपाल राजापूर श्री. जयराम बावदाणे, वनपाल पाली श्री. न्हानु गावडे , वनपाल लांजा श्री सारीक फकीर, वनरक्षक रत्नागिरी श्री प्रभू साबणे, वनरक्षक जाकादेवी श्रीमती शर्वरी कदम, वनरक्षक राजापूर श्री. विक्रम कुंभार, वनरक्षक कोर्ले श्रावणी पवार, वनरक्षक गुहागर शिंदे, वनरक्षक चिपळूण राहुल गुंठे व रेस्क्यू टीमचे श्री.महेश धोत्रे, श्री.तांबोळी, श्री.विजय म्हादये, श्री.दीपक म्हादये, श्री.नितेश गुरव , श्री.निलेश म्हादये उपस्थित होते अशा प्रकारच्या घटना घडल्यास किंवा वन्यप्राणी अडचणीत सापडल्यास वन विभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वन विभागाच्या वतीने श्रीमती गिरीजा देसाई विभागीय वनाधिकारी चिपळूण रत्नागिरी यांनी केली आहे.