रत्नागिरी:-रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून महायुतीतील घटक पक्ष शिवसेनेचे उमेदवार म्हणून विद्यमान पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठ्या शक्तिप्रदर्शनाने दाखल केला.
श्री. सामंत यांनी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घातला. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हा अर्ज त्यांनी सादर केला. यावेळी बांधकाम मंत्री तथा भारतीय जनता पार्टीचे नेते रवींद्र चव्हाण, भाजपचे दक्षिण रत्नागिरी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे बंटी वणजू आणि माजी नगराध्यक्ष सुदेश मयेकर उपस्थित होते.
अर्ज दाखल केल्यानंतर यानंतर पालकमंत्री सामंत यांच्या प्रचाराची जाहीर सभा माळनाका येथील हॉटेल विवेकच्या मैदानावर झाली. या मैदानावर तुडुंब गर्दी जमली होती. त्यात महिलांची संख्या मोठी होती दुपारी कडकडीत ऊन असूनही मतदारांनी मोठी हजेरी लावली होती. यावेळी उदय सामंत यांच्याबरोबरच मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते.