लांजा:-लांजा पोलिसांनी सापुचेतळे बाजारपेठ येथे धडक कारवाई करताना विनापरवाना देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करणाऱ्याला ताब्यात घेतले. या कारवाईत 14 हजार 300 रुपयांचा दारूसाठा जप्त करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सापुचेतळे बाजारपेठेत एकजण विनापरवाना देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीच्या मद्याची विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी 7.45 वाजता सापुचेतळे येथे धाड टाकली. यावेळी राकेश रामचंद्र गोरे (28, रा. सापुचेतळे बाजारपेठ) हा देशी-विदेशी मद्याच्या दारूसाठयासह आढळला. यावेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 14 हजार 300 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या घटनेत राकेश गोरे याला ताब्यात घेण्यात आले आहे. विनापरवाना देशी-विदेशी तसेच गावठी हातभट्टीची दारूची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी राकेश गोरे याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 चे कलम 65 (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला. या बाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल तेजस मोरे हे करत आहेत.