खेड:-खेड तालुक्यातील एका विद्यालयात चक्कर येवून बेशुद्ध पडलेल्या ‘त्या’ चार विद्यार्थांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने कळंबणी उपजिल्हा रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यानंतर आणखी एक विद्यार्थिनी चक्कर येवून बेशुद्ध पडल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे. मयुरी कैलास जगताप असे चक्कर येऊन पडलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिलाही उपचारासाठी कळंबणी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिच्याही प्रकृतीत आता सुधारणा झाल्याचे सांगण्यात आले.