दापोली:-तालुक्यातील आंबवली बुद्रुक येथे दापोली वनविभागाने नुकतीच माकडे पकडण्याची विशेष मोहीम राबवत माकडे पिंजऱ्यात बंद केली. पिंजऱ्यात सापडलेल्या माकडांना सुरक्षितरित्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.
तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात माकडांचा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र आंबवली ब्रु. ग्रामपांयतीच्या मागणीनुसार वनविभागाकडून 2 दिवस पिंजरे लावून माकडे पकडण्यात आली. यावेळी आंबवली बुद्रुक येथील ग्रामस्थ तसेच परिक्षेत्र वनविभागीय अधिकारी पी. जी. पाटील, दापोली वनपाल आर. डी. खोत, वनरक्षक शुभांगी गुरव, सुरज जगताप, दिगंबर झाडे, शुभांगी भिलारे, मनीष लोखंडे, जिनेश चिलबे, नीलेश केळशीकर, चंद्रकांत बंगाल आदींचे विशेष सहकार्य मिळाले.