दापोली:- महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी दापोली विधानसभा मतदारसंघातून निवडणूकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पाहायला मिळाला.
दापोली मतदारसंघातून शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हा प्रमुख संजय कदम हे महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणूक लढवित आहेत. खेड येथून दापोलीत आगमन झाल्यानंतर महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांनी सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार घालून ते आपल्या संपर्क कार्यालयात दाखल होण्यासाठी गेले. त्यावेळी शिवसैनिकांसह महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी उमेदवार संजय कदम यांना अक्षरशः उचलून खांद्यावर घेत नाचवत आनंद साजरा केला. त्यावेळी महाविकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांच्या विजयाच्या घोषणांनी दापोली शहर दणाणून गेले.
दापोली शहरातील शिवसेना संपर्क कार्यालयातून चालत जात दापोली उपविभागीय अधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीसाठीचे उमेदवार म्हणून संजय कदम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले. यावेळी दापोली विधानसभा मतदारसंघातील दापोली मंडणगड आणि खेड तालुक्यातील महाविकास आघाडीचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये उद्योजक सदानंद कदम, अनिकेत कदम, विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे, सायली संजय कदम, महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाचे मंडणगड तालुका अध्यक्ष मुस्ताक मिरकर, दापोली तालुका अध्यक्ष अर्जुन शिगवण, खेडचे गौस खतीब, मंडणगडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे दापोली तालुका अध्यक्ष सचिन तोडणकर, खेडचे अध्यक्ष विनायक निकम, मंडणगडचे अध्यक्ष सुभाष सापटे, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मंडणगड तालुका प्रमुख संतोष गोवळे, खेडचे संदीप कांबळे, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, उप नगराध्यक्ष खालिद रखांगे, राकेश सागवेकर, यूवासेना उप जिल्हा अधिकारी गणेश बिल्लार, विधानसभा सह संपर्क प्रमुख प्रविण लाड, शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटीका मानसी विचारे, नगराध्यक्षा ममता मोरे, खेड तालुका महिला संघटीका अंकिता बेलोसे, मंडणगड तालुका युवा अधिकारी विश्वनाथ टक्के, दापोली तालुका सचिव नरेंद्र करमरकर, शहर प्रमुख संदीप चव्हाण, तृशांत भाटकर, दर्शन महाजन, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शंकर कांगणे, खेड माजी तालुका प्रमुख भालचंद्र उर्फ राजा बेलोसे, संदिप धारिया, अनिल सदरे, अजिम सुर्वे, प्रणव म्हापुसकर, सुरज जोगले, माधवी बेर्डे, सिमा शिंदे, सुवर्णा सदरे, अनंत ऊर्फ भाऊ मोहीते, मंडणगडचे रघुनाथ पोस्टुरे, दिपक घोसाळकर, सुहेल मुकादम, उमेश घागरूम, समद मांडलेकर, जितेंद्र दवंडे, दिपक बोर्ले, विशाल कडव, मोमीन परकार, रामचंद्र फराटे, मनोहर गुजर, नितीन महामूणकर, राहुल कोकाटे, अॅड.सचिन बेर्डे, गणेश सावर्डेकर आदींसह खेड दापोली मंडणगड तालूक्यातील महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे 28 ऑक्टोबर रोजी दापोली येथे महाविकास आघाडीच्या आग्रहाखातर येणार आहेत. त्यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन होणार असल्याने परत परत लोकांना बोलावून त्रास देण्यापेक्षा आदित्य ठाकरे येणार आहेत. त्यावेळी सर्वाना बोलावले जाणार होते. त्यामुळे कोणालाच बोलावले गेले नव्हते, असे असतानाही संजय कदम यांच्यावर जिवापाड प्रेम करणारे स्वच्छेने आले आणि दापोली बाजारपेठ महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फुलून गेली. त्यामुळे झालेल्या गर्दीने दापोलीत महाविकास आघाडीचा बोलबाला दिसत होता. दापोली विधानसभा मतदारसंघ निवडणुकीची अधिसूचना जाहिर झाल्यानंतर महाविकास विकास आघाडीचे उमेदवार संजय कदम यांचा निवडणूकीतील पहीलाच उमेदवारी अर्ज दाखल झाला. आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केलेली उस्फूर्त गर्दी ही संजय कदम यांच्या विजयावर जणू शिक्कामोर्तब करणारी ठरली.