मंडणगड:-शहरातील आर. के. हॉटेलमध्ये कढईतील तेलाचा आगीने भडका उडाल्याने सिलेंडरच्या रेग्युलेटर जळून स्पोट होऊन काही आग लागल्याची घटना बुधवारी सायंकाळी 4च्या सुमारास घडली. यानंतर आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ मदतकार्य केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणण्यास मदत झाली. दरम्यान या दुर्घटनेत हॉटेलमधील एका कर्मचाऱ्यास दुखापत झाली असून सुदैवाने कोणतीही जीवित अथवा मोठी वित्त हानी झाली नाही.
आर. के. रेस्टो. हॉटेल हे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असल्याने नेहमीच गजबजलेले असते. बुधवारी सायंकाळी हॉटेलमधील कर्मचारी किचनमध्ये काम करत असताना अचानक कढईतील तेलाने पेट घेतला, आगीच्या भडक्यामुळे सिलेंडरच्या पाईप व रेग्युलेटरने पेट घेतला. रेग्युलेटर उडाल्याने स्पोट झाल्याचा आवाज सर्वत्र झाल्याने रुपेश साळुंखे, राहुल खांबे, साईराज सावंत, कौस्तुभ भिंगार्डे यांच्यासह आसपासच्या दुकानदारांनी तत्काळ आग विझविण्यासाठी मदतकार्य सुरु केले. यामुळे आग आटोक्यात आली. या घटनेचा उशिरापर्यंत पंचनामा झाला नव्हता. मात्र रहदारीच्या व गजबजलेल्या ठिकाणी झालेल्या दुर्घटनेत थोडक्यात नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला. एच. पी. गॅस एजन्सीचे कर्मचारी, महावितरणचे कर्मचारी यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली.