दापोली:-दापोली विधानसभा क्षेत्रातील महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे 28 ऑक्टोबर रोजी दापोली विधानसभा क्षेत्रात येत आहेत.
दापोली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात त्यांची सायंकाळी 5 वा. जाहीर सभा होणार आहे. या सभेला ते कुणावर तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.