रत्नागिरी:-तालुक्यातील नांदिवडे, गावखडी व पाली येथे गावठी दारु बाळगणाऱ्या संशयितांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केल़ा. ही कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून पोलिसांनी गावठी दारु हस्तगत केली. तसेच गावठी दारु बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
जितेश रघुनाथ चव्हाण (39), महेश विष्णू कुरतडकर (41) व एक महिला अशी तिघा संशयितांची नावे आहेत नांदिवडे येथे जितेश चव्हाण, पाली जोयशीवाडी येथे महेश कुरतडकर यांच्या ताब्यात गावठी दारु पोलिसांना आढळून आल़ी तर गावखडी भंडारवाडी येथे एका महिलेच्या ताब्यात पोलिसांना 9 लिटर गावठी दारु आढळली. पोलिसांनी याप्रकरणी संशयितांविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) नुसार गुन्हा दाखल केला