दापोली:-दापोली तालुक्यातील आंजर्ले भंडारवाडा समुद्रकिनारी अवैधरीत्या दारू साठा जवळ बाळगल्याप्रकरणी संजय उर्फ बाब्या कृष्णा धोपावकर या 71 वर्षीय वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धोपावकर हे सोमवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आंजर्ले भंडारवाडा समुद्रकिनारी आढळून आले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्याजवळ देशी दारू संत्रा जी एम असे लेबल असलेल्या दारूच्या 180 मिली मापाच्या सीलबंद 19 प्लास्टिकच्या बाटल्या आढळून आल्या. धोपावकर यांनी गैर कायदा विनापरवाना देशी दारूच्या बाटल्या स्वत:च्या ताब्यात बाळगल्याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65(इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.