दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड येथे खाडी पुलाखाली अवैध गावठी दारू साठा बाळगल्याप्रकरणी दीपक वसंत टेमकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मुरुड खाडी पुलाखाली झाडे झुडपाच्या आडोशाला दीपक टेमकर आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ सुमारे 9 लिटर गावठी हातभट्टीची दारू आढळून आली. टेमकर याच्या जवळून गावठी दारू बनवण्याकरिता लागणारे साहित्य देखील आढळून आले. तो दारू गाळीत असतानाच सापडला असून त्याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 कलम 65 (इ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास त्यापुढे पोलीस करीत आहेत.